बारामती (प्रतिनिधी) | NCP Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेत, आपल्या गटासह शिवसेना (शिंदे) – भाजप सरकारला पाठिंबा दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही बाजूचे नेते आपापली पक्षसंघटना बळकट करण्यासाठी हालचाली करत असल्याचं दिसतय.
अशातच आज, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस युवक (शरद पवार गट) शहराध्यक्षपदी सत्यव्रत अर्जुनराव काळे यांची निवड करण्यात आली आहे. गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संदीप गुजर, तालुका अध्यक्ष ॲड एस. एन. जगताप उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून बारामती शहर व तालुक्यात पक्ष बांधणी सुरू आहे. बारामती शहराध्यक्षपदी संदीप गुजर यांना तर तालुकाध्यक्षपदी हे एस एन जगताप यांची नियुक्ती केल्यानंतर शहर युवक अध्यक्षपदी माजी बांधकाम समिती सभापती सत्यव्रत काळे यांना संधी देण्यात आली आहे.
शरद पवारसाहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यांनी माझ्यावर विश्वास टाकत युवक अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन इथून पुढे काळात शहरात काम करणार असल्याचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
पुणे जिल्हा: शिरूर लोकसभा निवडणूकीत होणार काँटे की टक्कर
पुणे जिल्हा: खेड-आळंदी विधानसभा भाजपच्या वाट्याला?