Sai Tamhankar – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सई ताम्हणकरने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये सईने साडी परिधान केल्याचं दिसून येत आहे. सई या साडीत कमालीची मादक दिसत आहे. नक्षीदार काठाच्या काळ्या साडीत सईचे सौंदर्य अधिकच खुलतंय.
सईचा हा भन्नाट लूक म्हणजे जणू काही स्वर्गातील अप्सरेचा साज असाच आहे. अभिनेत्रीचा हा ग्लॅमर्स अंदाज फॅन्सला देखील आवडला असल्याचं दिसून येत आहे. सईचे फोटो म्हणजे तिच्या फॅन्ससाठी पर्वणीच, तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतो.