नवी दिल्ली : टेनिसपटू सानिया मिर्झा ही इंडियन फेड कप टेनिस स्पर्धेत ४ वर्षानंतर पुनरागमन करत आहे. तिचा भारताच्या ५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
6-time Grand Slam champion @MirzaSania has been named in India’s Federation Cup team for the Asia/Oceania Group I event to be held in February 2020. Sania last played competitively in October 2017. We wish her the best!@KirenRijiju @KirenRijiju @YASMinistry @IndiaSports pic.twitter.com/ZAYbjfIFG4
— SAI Media (@Media_SAI) December 24, 2019
३३ वर्षीय सानियासह भारताच्या संघात अंकिता रैना, रिया भाटिया, रूतुजा भोसले, करमन कौर थंडी आणि राखीव खेळाडू म्हणून सौजन्या बावीसेट्टीचा समावेश करण्यात आला आहे. माजी डेव्हिस कप खेळाडू विशाल उप्पल हे संघाचे कॅप्टन तर माजी फेड कप खेळाडू अंकिता भांबरी संघाच्या प्रशिक्षक असतील.
सानिया फेड कप स्पर्धेत २०१६ मध्ये अखेरची खेळली होती. सानिया हिने दोन वर्षापासून कोणताही टेनिस सामना खेळलेला नाही. तिने २०१७ मध्ये चायना ओपन स्पर्धेत अखेरचा सामना खेळला होता. ज्यामध्ये तिला आणि जोडीदार पेंग शुअाई हिला उपांत्यफेरीत पराभव स्विकारावा लागला होता.