मेलबर्न : पुढील वर्षी २० जानेवारीपासून मेलबर्न पार्क येथे होणा-या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत मागील वर्षीच्या तुलनेत १३.६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील एकूण बक्षिसाची रक्कम ७.१ कोटी आॅस्ट्रेलियन डाॅलरवर ( चार कोटी ९१ लाख अमेरिकन डाॅलर, जवळपास तीन अरब ५० कोटी रूपये) पोहचली आहे.
The world’s best players will compete for a record $71 million prize money at #AO2020.
— #AusOpen (@AustralianOpen) December 23, 2019
या स्पर्धेत पुरूष व महिला एकेरीत विजेत्या ठरणा-या खेळाडूंना प्रत्येकी ४१ लाख २० हजार डाॅलरचे बक्षीस मिळेल. तसेच पहिल्या फेरीत बाहेर होणा-या खेळाडूला ९० हजार आॅस्ट्रेलियन डाॅलरचे तर दुस-या फेरीत पराभूत होणा-या खेळाडूला १ लाख २८ हजार डाॅलरचे बक्षिस मिळेल.
दरम्यान, मागील स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरूष एकेरीत तर जापानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेतेपद पटकावलं होतं.