नवी दिल्ली : देशात सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा करोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. अजय कुमार यांना सौम्य ताप आला होता व त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे टेस्ट करण्यात आली. मंगळवारी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
करोनाची बाधा झालेले सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य वरिष्ठ नोकरशहा, लष्करी अधिकारी आणि मंत्री यांची करोना चाचणी झाली का? ते अजून स्पष्ट झालेले नाही.