T20 WorldCup 2022 – भारतीय संघाचा सेमीफायनल सामना इंग्लंडशी खेळला जाणार आहे. हा सामना गुरुवारी ऍडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. आज झालेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष्य लागले आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध सामना जिंकल्यास फायनलमध्ये जगभरातील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाकिस्तान-भारत सामान्यचा रोमांच पाहायला मिळणार आहे. मात्र उद्याच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) फॉर्म अजूनही गायबच आहे. त्यामुळे तो या नॉकआऊट सामन्यांमध्ये तरी चांगला खेळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
“सूर्यकुमार खूपच जबरदस्त बॅटिंग करतोय”, जोस बटलरला वाटतेय भीती!
रोहित शर्माची ( Rohit Sharma ) स्पर्धेतील मागील ५ सामन्यांची कामगिरी पहिली तर ती अत्यंत निराशाजनक राहिली आहे. प्रत्येक कर्णधार हा संघाला प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र रोहितमध्ये अशा प्रकारचा कोणताही गुण पाहायला मिळालेला नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ७ चेंडूत ४ धावा, दुसऱ्या सामन्यात दुबळ्या नेदरलँड्स संघाविरुद्ध ३९ चेंडूत ५३ धावा, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध १४ चेंडूत १५ धावा, चौथ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध ८ चेंडूत २ धावा आणि पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध १३ चेंडूत १५ धावा केल्या होत्या.
नेदरलँड्स संघाविरुद्धचे अर्धशतक सोडले तर रोहित ( Rohit Sharma ) कोणत्याही सामन्यात १५ धावांपेक्षा जास्त खेळलेला नाही. याचा परिणाम भारतीय संघाच्या सलामीच्या भागीदारीवर झाला आहे. पॉवर-प्ले असतानाही सुरुवातीच्या षटकांमध्ये सलामीच्या जोडीला मोठ्या प्रमाणात डॉट बॉल्स खेळावे लागतात. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माने या गोष्टी बदलल्या नाही तर सामन्याचा निकाल भारताच्या लागल्याची शक्यता कमी आहे.
भारतासाठी केएल राहुलने मागील दोन्ही सामन्यात सलग दोन अर्धशतक ठोकले आहे. तर दुसरीकडे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही. त्या दोघांनीही भारतीय संघाला आवश्यकता असताना दमदार खेळी खेळल्या आहेत. विराट कोहलीने ५ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह सर्वाधिक २४६ धाव केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने ५ सामन्यात ३ अर्धशतकांसह २२५ धावा केल्या आहेत.