भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 54 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर 2022 ला मतदान होणार असून, 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
भोर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे – भावेखल, हरिश्चंद्री, कासुर्डी गुमा, आपटी, आंबेघर, ब्राह्मणघर, बारे खुर्द, बसरापूर, भुतोंडे, दुर्गाडी, डेहेण कोंडगाव, गुहिणी, गुढे, हर्णस, कुरुंगवडी, कोळवडी कांबरे खेबा, करंदी खेबा, कुंबळे, करंदी खुर्द, करंदी बु., कोर्ले, कारी, कर्नावड, करंजगाव, खडकी, मळे, म्हाकोशी, म्हसर खुर्द,
निगुडघर, पारवडी, पसुरे, पांगारी नानावळे, राजघर, रावडी, सोनवडी, सांगवी बु., सांगवी तर्फे भोर, सांगवीखुर्द निधान, सांगवी हिमा, शिरवली तर्फे भोर, तेलवडी, विरवाडी, वेळवंड, वागजवाडी, वाठार हिंगे, वाठार हिमा, वाढाणे, येवली, अंगसुळे, भांबवडे हातनोशी, सांगवी वेखो साळुंगण, म्हसर बु या 54 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आखाडा रंगणार असून, थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
20 डिसेंबरला निकाल जाहीर
भोर तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम 18 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 5 डिसेंबरला अर्जाची छाननी होऊन 7 डिसेंबरला अर्ज मागे घेणे, उमेदवार याद्या प्रसिद्ध करणे आणि चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 18 डिसेंबरला मतदान होऊन 20 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.