मुंबई – साऊथचा सुपरस्टार कमल हासन आपल्या चाहत्यांना सरप्राईज करण्याची एकही संधी सोडत नाही. यावेळीही त्याने असेच काहीसे केले आहे. कमल हासन लवकरच चाहत्यांमध्ये खळबळ माजवताना दिसणार आहे.
Filming for #Indian2 from September. Wishing team @shankarshanmugh , #Subaskaran , @LycaProductions and everyone else involved a successful journey.
Welcome onboard thambi @Udhaystalin @RedGiantMovies_ https://t.co/iCbBZFX8X4 pic.twitter.com/uKInYMy15W— Kamal Haasan (@ikamalhaasan) August 23, 2022
कमल हासन त्याच्या ‘इंडियन 2’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. फर्स्ट लूकमध्ये कमल हसन चाहत्यांवर आपली जादू चालवताना दिसत आहे.
शंकर दिग्दर्शित ‘इंडियन 2’ मध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. कमल हासनचा लूक चित्रपटातून समोर आला आहे. ‘इंडियन 2’च्या पोस्टरमध्ये कमल हासन ऑल व्हाइट लूकमध्ये दिसत आहे.
चित्रात तो पांढरा शर्टमध्ये दिसत आहे. कमल हासनच्या पांढऱ्या लूकसह फोटोची पार्श्वभूमी लाल ठेवण्यात आली आहे. यासोबतच ‘तो परत आला आहे’ असे पोस्टरवर लिहिले आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहून तो कमल हसन आहे यावर विश्वास बसणे कठीण आहे. पोस्टरमध्ये तो पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. कदाचित हीच त्यांच्या प्रत्येक सिनेमाची खासियत असावी.
चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर करताना कमल हसनने पोस्टमध्ये सांगितले की, ‘इंडियन 2 चे चित्रीकरण सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय त्यांनी या प्रवासात त्यांच्यासोबत सामील झालेल्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये ‘थांबी उदय स्टॅलिन’चेही नाव आहे. ‘इंडियन 2’चे पोस्टर हिंदी आणि तामिळ या दोन भाषांमध्ये शेअर करण्यात आले आहे.
इंडियन 2’ हा 1994 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’चा दुसरा भाग आहे. ‘इंडियन 2’ मध्ये कमल हसन व्यतिरिक्त काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत.