भारताच्या विजयासह मालिका 1-1 बरोबरीत

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना नागपूर मध्ये पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बांगलादेश संघाने खेळाची दमदार सुरवात करत भारताच्या चमूत चिंता वाढवली होती. परंतु सुरवात चांगली झाली असली तरी मोठी धावसंख्या उभारण्यात बांगला देशाला अपयश आले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला.


भानरात आणि बांग्लादेश यांच्यात झालेला पहिला सामना बांगलादेश जिंकले होते. त्यामुळे भारतानं या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. या सामन्यात ‘महा’ चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण वादळ आणलं ते रोहितनं… त्याच्या दमदार फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांना पालापाचोळ्यासारखं भिरकावून दिलं.

फलंदाजीत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद 63 धावा केल्या. त्यातील 46 धावा या एकट्या रोहितनं केल्या होत्या. रोहितनं 23 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.