मुंबई – सिरीज,कप, ठिकाण कोणतही असो भारत पाकिस्तान मॅचची मजा काही वेगळीच असते. अशात जर वर्ल्डकपमधील सामना असेल तर सगळ्यांना त्या लढतीची आतुरता लागते. पुढील सहा महिन्यात टी २० वर्ल्डकप होणार असून यामध्ये क्रिकेट प्रेमींना भारत पाकिस्तान अशा लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ शेवटचे भिडले होते ज्यात भारताने विजय मिळवला होता. आता या दोन शेजारी देशांमधील आणखी एका सामन्याची रूपरेषा समोर आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील सामना (IND vs PAK) T20 विश्वचषक 2024 मध्ये दिसेल. दोन्ही देशांचे करोडो चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, T20 वर्ल्डकपदरम्यान भारत पाक हे संघ एकाच गटात असणार आहेत. हा वर्ल्डकप वेस्टइंडिज आणि न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार आहे.
न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दिवसा खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या करोडो क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.आता या वर्ल्डकप दरम्यान भारत पाक किती वेळा आमने सामने येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल.
या दोन देशांमधला शेवटचा T20 सामना T20 World Cup 2022 मध्ये झाला होता ज्यात विराट कोहलीने 82 रन्सची नाबाद इनिंग खेळली आणि एकेकाळी पराभवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताला करिष्माई विजय मिळवून दिला होता.