Sakshi Malik retires as Brij Bhushan associate wins WFI polls : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे मित्र(निकटवर्गीय) संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बनल्यानंतर अवघ्या काही तासांतच भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आणि सांगितले की, ती ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीमध्ये स्पर्धा करणार नाही.
#WATCH | Delhi: Wrestler Sakshi Malik says “We slept for 40 days on the roads and a lot of people from several parts of the country came to support us. If Brij Bhushan Singh’s business partner and a close aide is elected as the president of WFI, I quit wrestling…” pic.twitter.com/j1ENTRmyUN
— ANI (@ANI) December 21, 2023
भारताची अनुभवी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक गुरुवारी (21 डिसेंबर) पार पडली. संजय सिंह नवे अध्यक्ष झाले आहेत. ते माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत. या वर्षी पहलवानांनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता आणि दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले होते. ब्रिजभूषण शरण सिंगचा विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये साक्षी मलिकचाही समावेश होता. 31 वर्षीय साक्षीने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता ब्रिजभूषण यांच्या जवळचे कोणी अध्यक्ष झाल्यावर साक्षीने निवृत्तीचा निर्णय घेतला.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने अत्यंत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून बरेच लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. आम्ही ही लढाई हरलो आहोत. ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानते मात्र, या निवडणूकीचा निकाल पाहून अत्यंत निराश झाले आहे. मी कुस्ती सोडत आहे, अशा शब्दात साक्षीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या ब्रिजभूषण यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले त्यांचेच व्यावसायीक भागीदारी व अत्यंत जवळचे मित्र संजय सिंह जर अध्यक्ष बनले आहेत तर न्यायाची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे, त्यामुळेच मी या खेळापासून कायमचे दूर होण्याचा निर्णय घेतला आहे, असेही साक्षी म्हणाली.
दरम्यान, माजी WFI ब्रिजभूषण शरण सिंग यांचे विश्वासू (निकटवर्गीय) संजय सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अनेक प्रलंबित निवडणुकांमध्ये गुरुवारी अध्यक्षपदावर सहज विजय नोंदवण्यात यश मिळविले. संजयच्या पॅनेलच्या सदस्यांनी बहुतांश ठिकाणी सहज विजय नोंदवला. उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष संजय यांना 40 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी, माजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान यांना केवळ सात मते मिळाली.