मुंबई – सर्व क्रिकेट चाहते आजच्या दिवसाची आवर्जून वाट पाहत होते. आज भारत पाकिस्तान क्रिकेट टीम बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. या दिवसाची प्रत्येकालाच उत्सुकता होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच म्हणजे मोठी पर्वणीच असते. ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी २० वर्ल्डकप आणि त्यातील ही आजची मॅच मेलबर्न येथील मैदानावर पार पडणार आहे.
ऑस्ट्रेलियात देखील पावसाचे सावट असल्यामुळे क्रिकेट प्रेमींची धाकधूक चांगलीच वाढली आहे. आयसीसीने देखील सामन्याबाबत एक ट्विट केले आहे. रवींद्र जडेजा,जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर सारखे खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे भारताची रणनीती नेमकी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
India’s incredible batters 🆚 Pakistan’s fierce bowlers
Who’s winning this battle in today’s #T20WorldCup clash at the MCG?#INDvPAK pic.twitter.com/hV1nYozb65
— ICC (@ICC) October 23, 2022
भारताचा माजी कॅप्टन कपिल देवने तर भारतीय टीमची हालत पाहता ३० % विजयाचा चान्स असल्याचे भाकीत वर्तवले आहे. टीममध्ये वारंवार होणारे बदल आणि खेळाडूंची दुखापत हा विषय भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या टी २० विश्व चषकामध्ये भारताला साखळी सामन्यातच पॅकअप करावा लागला होता परंतु हाच वचपा यंदा भारत काढून शकेल अशी आशा सर्वांना आहे.
हॉट स्टार नसेल तरी पाहू शकता प्रेक्षपण
आता हॉट स्टार नसले तरी इतर ठिकाणी सामन्याचे प्रेक्षपण होणार आहे.हॉट स्टार सोबतच आता लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर देखील पाहता येईल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता प्रेक्षेपण सुरु होईल.
All the details surrounding Sunday’s clash between India and Pakistan at the #T20WorldCup and how you can watch it 📺#INDvPAKhttps://t.co/C45fmBFBBP
— ICC (@ICC) October 23, 2022
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.