मुंबई – ऐन दिवाळीत भारत पाकिस्तान सामन्याचा थरारक अनुभव अवघ्या क्रिकेट प्रेमींनी घेतला. शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या मॅचमध्ये अखेर भारताने बाजी मारली. प्रत्येक ओव्हरला सस्पेन्स वाढवणारी ही मॅच भारताने जिंकल्यानंतर भारतभर एकच जल्लोष सुरु झाला. या विजयामुळे भारतीयांनी दिवाळीची सुरुवातच अगदी जोशात आणि फटाके फोडत केली. भारताची माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट करत पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींची जणू फिरकीच घेतली आहे.
काल भारताने मॅच जिंकल्यानंतर सोशल मीडियावर टीमच्या शुभेच्छांचा महापूर आला. मिम्स तर अक्षरशः परतीच्या पावसाप्रमाणे धुमाकूळ घालताना दिसते. अशात वीरेंद्र सेहवागने एक व्हिडीओ ट्विट केला आहे जो पारंपरिक हरलेल्या पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींची प्रतिक्रिया व्यक्त करणारा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टीव्हीसमोर मॅच पाहताना दिसतोय आणि मॅच हरल्यानंतर त्याने थेट टीव्ही फोडल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. सेहवागने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले,”रिलॅक्स पडोसीयो,हा फक्त खेळ आहे… तुम्ही चांगले प्रयत्न केले. आमच्याकडे दिवाळी असल्यामुळे आम्ही फटाके फोडत आहोत आणि तुम्ही उगाच टीव्ही फोडताय,टीव्हीचा काय गुन्हा” असं सेहवाग म्हणतो.
View this post on Instagram
भारत पाकिस्तान मॅचदरम्यान पाकिस्तान हरल्यानंतर अनेकदा पाकिस्तानी लोकांचे टीव्ही फोडतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. सेगवागने हाच धागा पकडत कालच्या मॅचवर भाष्य केलं आहे. सेहवागच्या या ट्विटला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.