#CWC19 : इंग्लंडचे भारतासमोर विजयासाठी 338 धावांचे लक्ष्य

बर्मिंगहॅम – सलामीवीर जॉनी बेयरस्टोची शतकी तर जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतीय संघासमोर 338 धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 337 धावसंख्येपर्यंत मारली आहे. मोहम्मद शमी याने 5 गडी बाद केले.

इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्याचा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजीनी सार्थ ठरविला. इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी करत इंग्लंड चांगली सुरूवात करून दिली. कुलदीप यादव याने जेसन राॅय याला 66 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जाॅनी बेयरस्टो याने जो रूटच्या साथीने इंग्लंडची धावसंख्या 200 पार नेली. मोहम्मद शमीने त्याला बाद केले. जाॅनी बेयरस्टोने 109 चेंडूत 111 धावा केल्या.

त्यानंतर बेन स्टोक्सने संघाची धूरा आपल्या हाती घेत धुवाधार फलंदाजी करत 47 षटकांतच संघाची धावसंख्या 300 पार नेली. त्यानंतर 79 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्स बाद केले. बेन स्टोक्स याने 54 चेंडूत 79 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजीत मोहम्मद शमी याने 10 षटकांत 69 धावा देत सर्वाधिक 5 गडी बाद केले, तर कुलदीप यादव याने 1 गडी बाद केला. जसप्रीत बुमराह याने 10 षटकात 44 धावा देत गडी बाद केला तर युजवेंद्र चहल याने 10 षटकांत सर्वाधिक 88 धावा दिल्या. चहल आणि हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात गडी बाद करण्यात अपयश ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)