India ready to host 2036 Olympics :- यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत भारतीय खेळाडू व्यस्त असतील, पण भारत सरकारने २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. 2030 मध्ये युवा ऑलिम्पिक आणि 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, ज्या क्षणी बोली सुरू होईल त्या क्षणी भारत ऑलिम्पिकचे यजमानपदासाठी पूर्णपणे तयार असेल. आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहोत आणि आपण अशा देशांपैकी आहोत जिथे तरुणांची शक्ती अफाट आहे. खेळांसाठी भारतापेक्षा मोठी बाजारपेठ नाही. भारत 2030 युवा ऑलिम्पिक आणि 2026 उन्हाळी ऑलिंपिकचे यजमानपद भूषवणार आहे.
ठाकूर बोलताना पुढे म्हणाले की, अलीकडेच धर्मशाळा येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पाहण्यासाठी चार हजारांहून अधिक परदेशी चाहते इंग्लंडमधून आले होते आणि त्यांनी येथील सुंदर स्टेडियमचे कौतुक केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
IPL 2024 : ‘या’ 5 खेळाडूंचे असेल 17 वे आयपीएल..! 2008 पासून प्रत्येक हंगामात राहिला आहे सहभाग….
पॅरिसनंतर आता 2028 मध्ये लॉस एंजेलिस आणि 2032 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. यंदा ऑलिम्पिक जुलै-ऑगस्टमध्ये पॅरिस, फ्रान्समध्ये होणार आहे. त्यासाठीची तयारी तेथे पूर्ण झाली आहे.