पणजी – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag thakur) यांनी सोमवारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI 2023 ) उद्घाटन करताना देशातील परदेशी चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन वाढवण्याची आणि देशात होणाऱ्या खर्चाच्या प्रतिपूर्तीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्पांना भारतात आकर्षित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ठाकूर म्हणाले, गेल्या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात केंद्र सरकारने (Modi Sarkar) परदेशी चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन योजना सुरू केली होती. 2.5 कोटी रुपयांच्या मर्यादेसह देशात झालेल्या खर्चाच्या 30 टक्के पर्यंत परतफेड करण्याची योजना सध्या सुरु आहे. आता कमाल प्रोत्साहन रक्कम 30 कोटी रुपयांपर्यंत असेल. (subsidy for foreign films) भारतात मीडिया आणि मनोरंजन उद्योगाची वाढ वार्षिक 20 टक्के आहे. आज आपण जगातील पाच सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहोत. भारताचा चित्रपट उद्योग हा केवळ दक्षिण-पूर्व आशियातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. (Film Festival in Goa)
दरम्यान, चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी महोत्सवातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी पाच सदस्यीय ज्युरीचे प्रमुख म्हणून काम पाहतील. दिव्या दत्ता, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि चित्रपट निर्माते कृष्णा डीके आणि उत्पल बोरपुजारी हे उद्घाटन श्रेणीसाठी ज्युरी पॅनेलचा भाग आहेत. 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 10 भाषांमधील एकूण 32 नोंदी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी निवडल्या गेल्या आहेत.(Goa film Festival)
मायकेल डग्लस यांना सत्यजित रे पुरस्कार
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 28 नोव्हेंबर रोजी ते इफ्फी मास्टर क्लासलाही ते संबोधित करतील.