भारत-पाकिस्तान टी-20 सामना?

 मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे, मात्र त्यापूर्वीच परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सराव सामने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या दोन संघांच्या सामन्यांची जागतिक क्रिकेट सातत्याने प्रतीक्षा करत असते. या दोन संघांमध्ये जेव्हा जेव्हा सामने होतात तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष लागते. या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा उत्साह काही वेगळाच असतो.त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेपुर्वी सराव सामने आयोजित करण्याचे ठरविले आहे.

अर्थात या सामन्यांबाबत केंद्र सरकार परवानगी देईल का, अशी शंका असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्यातरी नकार कळविला आहे. भारत आणि पाकिस्तान संघ केवळ परिषदेच्या स्पर्धांमध्येच
एकमेकांशी खेळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.