चीनच्या कुरापतींमुळेच भारत एलएसीवर आक्रमक

चीन करतो आहे द्वीपक्षीय कराराचे उल्लंघन

नवी दिल्ली – लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी- लाईन ओफ ऍक्‍च्युअल कंट्रोल) सुरू असलेल्या घडामोडींना चीन जबाबदार असल्याचे भारताने पुन्हा एकदा म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, गेल्या काही महिन्यांत चीनने पूर्व लडाखमधील एलएसीची स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला होता. या कृती एलएसीच्या द्विपक्षीय करार व प्रोटोकॉलचे उल्लंघन करतात. या घडामोडी त्यामागचेच कारण आहे.

सीमेवरील घडामोडींवर चीनने केलेल्या टिप्पणीवर बोलताना मंत्रालयाने चीन आपण दिलेल्या शब्दानुसार कारवाई करेल अशी अशा असल्याचे म्हटले आहे.
नेपाळच्या काळी नदीमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी श्वानपथके पिथौरागड नेपाळच्या काळी नदीमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सशस्त्र सीमा दलाने भारत – नेपाळ सीमेवर श्वानपथके तैनात केली आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या 55 व्या बटालियनचे अधिकारी संतोष लाल म्हणाले की, असामाजिक घटक काळी नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याचा फायदा घेत भारतीय सीमेमध्ये प्रवेश करतात. याला आळा घालण्यासाठी सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांनाही जवानांनी सतर्क केले आहे. नेपाळमधून भारतीय सीमेमध्ये कोणताही घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास त्वरित एसएसबीला कळवा असे लोकांना सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.