बॉलीवूडच्या इतिहासात काही संगीतकारांनी आपला अवीट ठसा उमटवला आहे. त्यांच्या संगीतकलेचे गोडवे आजच नव्हे तर येणाऱ्या काळातही गायिले जातील. नव्वदीच्या दशकापासून सिनेसंगीताच्या क्षेत्रात ए. आर. रहमान या संगीतकाराचा उदय झाला आणि पाहतापाहता तो जगप्रसिद्ध झाला.
View this post on Instagram
सध्या त्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काही तासातच या पोस्टला 1.5 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. या फोस्ट मध्ये त्याच्या चाहत्याने तामिळ लिपीचा वापर करून त्याचे हे स्केच काढले आहे. रहमानला हे स्केच इतके आवडले की, त्याने ते त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केले आणि बघता बघता ते तुफान व्हायरल झाले. लोकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
View this post on Instagram
दरम्यान, अलीकडेच रहमान हा सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार असल्याचेसमोर आले होते. फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या क्रमवारीनुसार रहमानची वार्षिक कमाई ही बॉलीवूड नायक-नायिकांपेक्षाही जास्त आहे.
View this post on Instagram
सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये रहमान 16 व्या स्थानावर आहे; पण सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगींतकारांच्या यादीत तो अव्वल आहे. 2019 मध्ये रहमानचे एकूण वार्षिक उत्पन्न 94.8 कोटी इतके होते.