भारताचा विक्रम : 85 दिवसांत 10 कोटींना दिली लस

दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न सुरु

भारताने व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत शनिवारी मोठा विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.

शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका निवदेनात म्हटले की, केंद्र आणि रराज्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भारतातील डेथ रेट जगातील सर्वात कमी (1.28%) आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.

आतापर्यंत भारतात 90 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि 55 लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये ही संख्या 99 लाख आणि 47 लाख आहे. 45 ते 60 वर्षांच्या वयाच्या 3 कोटी लोकांना पहिला आणि 6 लाखांपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3.95 कोटी लोकांना पहिला आणि 17.88 लाख जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

भारताने पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू केले होते. दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. यामध्ये 45 पेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर 2 एप्रिलपासून सुरू झालेल्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वच लोकांना लसी देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.