मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठीवरील शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पाठीच्या स्नायूंमध्ये साकळलेल्या रक्तामुळे त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यांच्या कमरेजवळचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे राज यांच्यावर शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता ते रुग्णालयातून घरी परतरणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात काही चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसेच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.