तुला परत मानले रे ठाकूर !, विराटचा मराठमोळा अंदाज

ब्रिस्बेन :- ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. पण तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच झुंजवले.  पदार्पणाची कसोटी खेळणारा वॉशिंग्टन सुंदर आणि केवळ एका कसोटीचा अनुभव असलेल्या शार्दुल ठाकूर यांनी भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर  भारताचा डाव सावरला. या दोघांनी दमदार खेळी करत सातव्या विकेटसाठी विक्रमी 123 धावांची भागिदारी केली.

या सामन्यात शार्दुलने 115 चेंडुत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 67 धावांची खेळी केली. तसेच सुंदरनेदेखील 144 चेंडूत 62 धावा केल्या.  दोघांच्या या खेळीमुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त 33 धावांची आघाडी घेतला आली. ऑस्ट्रेलियाला ही आघाडी 100 पेक्षा अधिक धावांची करता आली असती, पण ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने यशस्वी झुंज दिली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. तळाच्या फळीतील फलंदाजांप्रमाणे बॅट फिरवण्यात धन्यता न मानता त्यांनी तंत्रशुद्ध खेळ केला आणि त्यामुळे भारताला पहिल्या डावात 336 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

शार्दुल आणि सुंदरच्या खेळीची भारतीय संघाचा कर्णधार विराटने स्तुती केली आहे . विशेष म्हणजे त्याने शार्दुल ठाकूर याचं मराठीत कौतुक केलं.

विराटने म्हटले आहे की, तुम्ही दोघांनी शानदार फलंदाजी केली. अतिशय मोक्याच्या वेळी तुमची उपयुक्तता सिद्ध केलीत.  स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवत या सामन्यात भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. कसोटी क्रिकेट काय आहे हे  तुम्ही दाखवून दिलं. वॉशिंग्टन, तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केलीस, अशा शब्दात विराटने सुंदरचे कौतुक केलं आहे तर’तुला परत मानले रे ठाकूर!”,  अशा मराठमोळ्या अंदाजात ( tula parat maanla re Thakur ) शार्दुलची स्तुती करत कौतुक केलं आहे.

दरम्यान, दोघांनीही  या सामन्यात आपल्या कारर्किदीतील  पहिले कसोटी अर्धशतक झळकावले.  याबरोबरच वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी 7व्या विकेटसाठी 123 धावांची विक्रमी भागीदारी देखी आपल्या नावे केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.