हॉकीत पहिल्या सामन्यात पुरुष विजयी; महिला पराभूत

टोकियो – भारतीय पुरुष संघाने हॉकीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आश्वासक सुरुवात केली आहे. संघाच्या हरमनप्रीतचे दोन गोल आणि त्याहीपेक्षा अखेरच्या पाच मिनिटात गोलरक्षक श्रीजेशने दाखवलेली सतर्कता यामुळे न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव करण्यात यश आले. आता भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

 

हरमनप्रीतने (26 आणि 33वे मिनिट) दोन गोल केले. तिसरा गोल रुपिंदर पालने 10व्या मिनिटाला केला. आठव्या मानांकित न्यूझीलंडसाठी केन रसेल आणि सामना संपण्यास सहा मिनिटे असताना स्टिफन जेन्नेसने गोल केले. याशिवाय भारतीय हॉकी महिला संघाला अव्वल मानांकित नेदरलॅंडस विरुद्ध साफ निष्प्रभ ठरल्या.

नेदरलॅंडसच्या वेगवान आणि आक्रमक खेळाचा त्यांना सामनाच करता आला नाही. मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर उत्तरार्धातील नेदरलॅंडसच्या खेळाने सामना अगदीच एकतर्फी झाला. तिसऱ्या सत्रात तीन आणि चौथ्या सत्रात एक गोल करत नेदरलॅंडसने 5-1 असा सामना जिंकला.

भारतीय महिला 36वर्षांनी प्रथमच दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये खेळत आहेत. दुसऱ्या फेरीत त्यांची गाठ 26जुलैस जर्मनीशी पडणार आहे.

न्यूझीलंडकून फेलिस अल्बर्स हिने दोन( 43वे मिनिट), व्हॅन गॅफेन (33वे मिनिट), माटा (45वे मिनिट), काईया जॅकलिन व्हॅन मासाक्केर (52वे मिनिट) यांनी गोल केले. भारताचा एकमात्र गोल कर्णधार राणी रामपाल हिने10व्या मिनिटाला केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.