IND vs ENG 5th Test (Day 1-Stumps) : कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्विन यांची भेदक गोलंदाजी व यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहितची नाबाद अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर यजमान टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 1 गडी गमावून 135 धावापर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. यानुसार भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागे आहे. कर्णधार रोहित शर्मा 52 (83 चेंडू,6 चौकार, 2 षटकार) धावांवर नाबाद असून शुभमन गिल 26 धावांवर (39 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार) नाबाद आहे. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली आहे.
भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. 58 चेंडूत 57 धावा करून तो बाद झाला. शोएब बशीरने त्याला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. यशस्वीने 57 धावांच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकार लगावले. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वीचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे अर्धशतक होते. त्याचवेळी, रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 18 वे अर्धशतक ठरले.
Stumps on the opening day in Dharamsala! 🏔️#TeamIndia move to 135/1, trail by 83 runs.
Day 2 action will resume with Captain Rohit Sharma (52*) & Shubman Gill (26*) in the middle 💪
Scorecard ▶️ https://t.co/OwZ4YNtCbQ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nhUXwzACi4
— BCCI (@BCCI) March 7, 2024
तत्पूर्वी, टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करू इच्छितो. धर्मशाला येथील कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला आहे. कुलदीप यादव आणि आर.अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं.
IND vs ENG 5th Test : कुलदीपचा पंजा तर अश्विनचा चौकार, पहिल्या डावात इंग्लंड 218 धावांत गारद…
भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला आहे. सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी खेळत चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. तर इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.
इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली होती. बेन डकेट आणि जॅक क्राउली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी तोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेट 27 धावा करू शकला. यानंतर क्राउलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला.
पहिल्या सत्रात 25.3 षटके टाकली गेली आणि इंग्लंडने 100 धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 94 धावा करताना 6 विकेट गमावल्या. एकवेळ इंग्लंडची धावसंख्या 38व्या षटकात दोन गडी बाद 137 धावा होती. यानंतर क्राउलीची विकेट पडली आणि इथून इंग्लंडचा संपूर्ण डाव गडगडला. दोन बाद 137 येथून इंग्लंडचा संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला. इंग्लंडने 20 षटकांत 81 धावा करताना शेवटच्या 8 विकेट गमावल्या.
IND vs ENG 5th Test : यशस्वीने 57 धावांच्या खेळीसह मोडीत काढले कोहलीचे 3 मोठे विक्रम…
क्राउलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला.