मुंबई – लोकांची दिशाभूल करण्याचे काम शिवसेनेचे खासदार संजय राऊत करत आहेत. राऊत हे दिवसेंदिवस बिन बुडाचे तांबे बनत चालले आहेत. तसेच ते शरद पवारांचे पगारी आहेत. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंकडून जी अपेक्षा होती ती आता राहिली नाही. म्हणून उद्धव ठाकरेंचे राहिलेले अस्तित्वही मिटवायची सुपारी संजय राऊतांनी घेतली असल्याची गंभीर आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
एका वाहिनीशी बोलताना राणा म्हणाले की, एकनाथ शिंदेमध्ये खऱ्या शिवसैनिकाचे विचार दिसून येतात. 90 टक्के शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत आहे. बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेकडेच जाणार. एवढचं नाही तर चिन्हासोबत शिवसेना भवनही एकनाथ शिंदेना मिळेल.
संजय राऊतांनी नुकतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. लवकरच ही मुलाखत प्रकाशित केली जाईल. यानंतर अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे जनतेसमोर येत नव्हते त्या त्या वेळेस संजय राऊत ठाकरेंची मुलाखत घ्यायचे आणि ती प्रकाशित करायचे.
संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांचे म्हणणे ऐकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवण्याचे श्रेय संजय राऊतांना जाते असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.