IND vs SL – टीम इंडियाने मायदेशात श्रीलंकेला अगोदर टी-२० आणि आता एकदिवसीय मालिकेत पराभूत केले. भारतासाठी ही एकदिवसीय मालिका अत्यंत खास ठरली. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जुना विराट कोहली पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे विराट या मालिकेत खेळताना दिसला ते पाहून प्रत्येक चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. भारताने रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला.
Babar Azam । बाबर आझम ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात; अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ!
या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले होते. कर्णधार रोहित शर्माने एक गोलंदाज कमी खेळवला आणि सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले होते. सूर्यकुमारला फलंदाजीत शेवटच्या १२ चेंडूसाठी मैदानावर उतरण्याची संधी मिळाली होती. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. याच सामन्यात सूर्यकुमार क्षेत्ररक्षण करत असताना घडलेला किस्सा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महिलांची 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा; भारताचा अमिरातीवर मोठा विजय
सूर्यकुमार सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना त्याला चाहत्यांनी ‘आमचा संजू कुठे आहे? असे विचारले. यावर सूर्यकुमारने हृदयाच्या इथे हात केला आणि सांगितले की तो माझ्या हृदयात आहे. त्याचे मन जिंकणारे उत्तर ऐकून चाहते खूपच खुश झाले. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. संजू सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाली होत. त्यानंतर तो या मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी अमरावतीचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याला संघात बोलावण्यात आले होते.
View this post on Instagram
भारतीय संघाला आगमी काळात न्यूझीलंडसोबत एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळाच्या आहेत. त्याचबरोबर त्याचहाबरोअबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकाही खेळायची आहे. भारतीय संघासाठी यंदाचे वर्ष अत्यंत महत्वाचे असणार आहे. कारण याच वर्षात आशिया चषक आणि क्रिकेटमधील सर्वात मोठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे.