IND vs SL – भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळाची झलक दाखवली. सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाया मजबूत केला आणि त्यानंतर विराट कोहलीने आपल्या दमदार फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.
IND vs SL | कोहलीच्या ‘विराट’ शतकाने मोडला श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. त्यामुळे आता पाहुण्या श्रीलंकेला विजयासाठी धावांचा मोठा डोंगर सर करावा लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ९२ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली. रोहितचे अर्धशतक हुकले आणि तो ४९ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमनने कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११० चेंडूत १३१ धावांची भागीदारी केली.
#AxarPatel | केएल राहुलनंतर अष्टपैलू अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात
शुभमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत ८९ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. हे त्याचे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. याआधी शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते. शुभमन ९७ चेंडूत ११६ धावांवर खेळत असताना कसून राजिताने त्याला त्रिफळाचित केले. यांनतर कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत १०८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, कोहलीने ८५ चेंडूत एकदिवसीय कारकिर्दीतील ४६वे तर या मालिकेतील दुसरे शतक झळकावले.
या सामन्यात विराट कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १६६ धावा केल्या. या खेळीसह विराट आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेकडून कसून रजिता आणि कुमार लाहिरूने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी करुणारत्नेला एक गडी बाद केला. या सामन्यात शेवटच्या पाच षटकांत भारताने ५८ धावा फाटकावल्याने मोठी धावसंख्या उभारली.
Innings Break!
A stupendous knock of 166* from @imVkohli & a fine 116 by @ShubmanGill guides #TeamIndia to a formidable total of 390/5.
Scorecard – https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/aGHQU7PQVw
— BCCI (@BCCI) January 15, 2023