Suryakumar Yadav – भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त लयीत खेळत आहे. त्याने मागील वर्षात टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा केला आहेत. त्याने आत्तापर्यंत ४५ टी-२० सामने खेळले असून १८० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने आणि ४६.४१ च्या सरासरीने १५७८ धावा फटकावल्या आहेत. सध्या तो टी-२० फॉरमॅटमधील जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सूर्यकुमारने शनिवारी झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यात ५१ चेंडूत ११२ धावा करत शतक झळकावले. त्याच्या या दमदार खेळीची अनेकांनी प्रशंसा केली आहे.
Suryakumar Yadav | विराट कोहलीने ठेवलेली स्टोरी पाहून सूर्यकुमारचा आनंद गगनात मावेना
दरम्यान, पाकिस्तानच्या माजी खेळाडुनेही सूर्यकुमारचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने तर सूर्यकुमारला थेट ‘नवा युनिव्हर्स बॉस’ असे म्हटले आहे. पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने म्हटले की,”नवा युनिव्हर्स बॉस सूर्यकुमार यादव-द बिस्ट आहे. आता या खेळाडूबद्दल मी काय बोलू? मी याआधीही म्हटले आहे की सूर्यकुमारसारखा खेळाडू आयुष्यात एकदाच येतो. त्याने खेळलेली ५१ चेंडूत ११२ धावांची खेळी इतर कोणीही खेळू शकणार नाही.”
“त्याने लहानपणी माझी बॅटिंग पहिली नाही…”, सूर्यकुमारच्या तुफानी खेळीवर द्रविड यांची प्रतिक्रिया
कनेरियाने पुढे म्हटले की,”क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमीच एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलबद्दल बोलता, पण हे दोघेही सूर्यासमोर फिके पडतात. सूर्यकुमारने आधीच त्यांना मागे टाकले असून टी-२० क्रिकेटला नव्या स्तरावर नेले आहे.” सूर्यकुमारच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या १३७ धावांतच सर्वबाद झाला.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात केलेल्या चुका टाळल्याने तिसऱ्या सामन्यात भारताला सहज विजय मिळवता आला. या सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा ९१ धावांनी पराभव करत टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. हार्दिक पंड्याने त्याच्या नेतृत्वात भारताला सलग तिसऱ्या टी-२० मालिकेत विजय मिळवून दिला आहे.
Danish kaneria said, ” Surya is new Universe Boss”#Cricket #Cricketnews #SuryakumarYadav #ChrisGayle #TeamIndia #IndianCricketTeam #UniverseBoss #CricketTwitter pic.twitter.com/DPkPVyS6IF
— CricInformer (@CricInformer) January 8, 2023