Riyan Parag Created History : आयपीएल 2024 चा नववा सामना गुरुवारी(दि.28) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने सलग दुसरा विजय नोंदवला. संघाच्या या विजयात रियान परागने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाज रियान पराग ( Riyan Parag ) याने आपल्या संघाचा कर्णधार संजू सॅमसनचा ( Sanju Samson ) एक विक्रम मोडीत काढला आहे.
आसामच्या या फलंदाजाने आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात 43 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्सविरूध्दच्या सामन्यात 45 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि सहा षटकार आले. आयपीएलच्या 56 सामन्यांमधले हे त्याचे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ठरले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीचा पराभव केला.
संजू सॅमसनचा मोडला विक्रम…
रियान परागसाठी हा सामना खूप खास होता. तो दिल्लीविरुद्ध त्याच्या T20 कारकिर्दीतील 100 वा सामना खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 34 टी-20 सामने खेळले. यासह त्याने संजू सॅमसनचा विक्रम मोडला. रियान पराग हा 100 T20 सामने खेळणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 22 वर्षे आणि 139 दिवसांच्या वयात 100 वा टी-20 सामना खेळला, तर संजू सॅमसनने 22 वर्षे आणि 157 दिवसांच्या वयात 100 वा सामना खेळला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2008-2024-top-10-batsmen-to-score-fastest-fifties-in-ipl-history-check-list/
या यादीत वॉशिंग्टन सुंदर (22 वर्षे 181 दिवस), इशान किशन (22 वर्षे 273 दिवस )आणि ऋषभ पंत (22 वर्षे 361 दिवस) यांचीही नावे आहेत, ज्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी कारकिर्दीतील 100 वा टी-20 सामना खेळला आहे.