U19 Asia Cup 2023 IND vs PAK Live Score : अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला तर पाकिस्तानने नेपाळला पराभूत केले होते.
दुबईतील आयसीसी अकादमीत येथे होत असलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात नऊ गडी गमावून 259 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. आदर्श सिंगने सर्वाधिक 62 धावा केल्या. उदय सहारनने 60 आणि सचिन दासने 58 धावांचे योगदान दिले. अर्शीन कुलकर्णी 24 धावा करून बाद झाला तर रुद्र पटेल एक धाव काढून बाद झाला.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद जीशानने चार विकेट घेतल्या. आमिर हसन आणि उबेद शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अराफत मिन्हासने एक विकेट घेतली.
Pakistan-U19 is set to pursue a target of 260 runs for triumph against India-U19 in a 50-over battle. The match unfolds with anticipation as both teams aim for success on the ground.
Catch live action at: https://t.co/ooyMAa27sN#ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/iwICHNtb98— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 10, 2023
दोन्ही संघांनी जिंकला आहे पहिला सामना…
भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत अफगाणिस्तानला अवघ्या 173 धावांत गुंडाळले आणि भारतीय संघाने सात विकेट्स राखून ही धावसंख्या गाठली. अर्शिन कुलकर्णीने भारताकडून चमकदार कामगिरी करत 70 धावा केल्या आणि तीन बळी घेतले.
U19 Asia Cup 2023 : कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय…
दुसरीकडे, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. मोहम्मद झीशानने सहा विकेट घेतल्याने पाकिस्तानने नेपाळला 152 धावांत गुंडाळले होते. यानंतर अझान अवेस आणि साद बेग यांच्या अर्धशतकांमुळे संघाने 26.2 षटकांत सात विकेट्स शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला.