India vs Afghanistan U19 Asia Cup, 2023 : 19 वर्षाखालील आशिया कप 2023 सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 173 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 37.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून अर्शीन कुलकर्णीने शानदार खेळी केली. त्याने 4 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. कुलकर्णी याने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजी सोबत गोलंदाजीतही कमाल करत 3 विकेट्स घेतल्या.
भारतीय कर्णधार उदय सहारनने सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 50 षटकात 173 धावा करत सर्वबाद झाला. संघाकडून सलामीवीर जमशेद झद्रानने 43 धावा केल्या. नुमान शाहने 25 धावांची खेळी केली. कर्णधार नसीर खानने केवळ 5 धावा केल्या. यादरम्यान भारताकडून अर्शिन आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. अर्शीनने 8 षटकात 29 धावा दिल्या. तर राजने 10 षटकात 46 धावा दिल्या. नमन तिवारीने 10 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. अभिषेक आणि मुशीरलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
A remarkable display of dominance made Team India emerge victorious by 7 wickets with more than 10 overs left. Congratulations, team India!#ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/k89gWRWsAs
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 8, 2023
अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 37.3 षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून सलामीवीर अर्शीनने 105 चेंडूंचा सामना करत 4 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. आदर्श सिंगने 12 चेंडूत 14 धावा केल्या. रुद्र पटेल 5 धावा करून बाद झाला. कर्णधार उदयही काही विशेष करू शकला नाही. 49 चेंडूत 20 धावा करून तो बाद झाला. मुशीर खानने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 53 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. मुशीरच्या खेळीत 3 चौकारांचा समावेश होता.
#TeamIndia off to a winning start in the #ACCMensU19AsiaCup 🙌🙌
They beat Afghanistan by 7 wickets at the ICC Academy Ground in Dubai 👌👌
Scorecard: https://t.co/4FgkV7W5HW pic.twitter.com/lXrAPruQlM
— BCCI (@BCCI) December 8, 2023
दरम्यान, 2023 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा पुढील सामना आता पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना 10 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यानंतर 12 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामनाही दुबईतच होणार आहे.