India vs South Africa 1st T20 : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांदरम्यान टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून (10 डिसेंबर) टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारताचाच वरचष्मा (वर्चस्व) राहिला आहे. यावेळीही टीम इंडिया आफ्रिकेला कडवी टक्कर देऊ शकते. जर आपण डर्बनबद्दल बोललो तर पहिला सामना येथे होईल. भारताने येथे आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 टी-20 सामने खेळले असून या कालावधीत 5 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाला दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. हा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. या दौऱ्यातील एक सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
यावेळी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये पहिला सामना खेळणार आहे. भारताचा येथेही रेकॉर्ड चांगला राहिला आहे. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनमध्ये खेळला होता. तो 37 धावांनी जिंकला होता. त्यानंतर जानेवारी 2011 मध्ये दुसरा सामना झाला. हा देखील 21 धावांनी जिंकला होता. डिसेंबर 2006 मध्ये भारताने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. त्याही सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता.
Team India : रोहित शर्मानंतर शुभमन गिलकडेच नेतृत्वगुण – आकाश चोप्रा
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत भारताकडून सर्वाधिक टी-20 धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने 3 सामन्यात 143 धावा केल्या आहेत. तर महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 135 धावा केल्या आहेत. रोहित शर्माही 135 धावांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, या तिनही खेळाडूंचा संघात समावेश नाही आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजीची मदार ही युवा खेळाडूवर असेल.