दुबई :- आयसीसीची टी20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत आहे. या स्पर्धेतील सर्वात चर्चिला जाणारा हायव्होल्टेज सामना म्हणजे भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत अमेरिकेतील न्युयॉर्कमध्ये रंगणार आहे. याबाबत आयसीसी लवकरच अधिकृत घोषणाही करणार आहे.
फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क, डाउनटाउन मॅनहॅटनपासून सुमारे 25 मैलांवर असलेली फक्त तीन ठिकाणांची या स्पर्धेसाठी स्थान निश्चिती केली जाणार आहे. या स्टेडियमवर हंगामी स्वरूपात जवळपास 35 हजार आसन क्षमता केली जाणार आहे.
सध्याच्या मोजणीनूसार या शहरात जवळपास 7 लाख भारतीय तर 1 लाख पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये या सामन्याबदल प्रचंड उत्सूकता असून त्यामुळेच याच शहरात सामना झाला तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल असेही अमेरिका क्रिकेट संघटनेने म्हटले आहे.
MS Dhoni : ‘सचिन तेंडुलकर’नंतर BCCIने ‘एम.एस. धोनी’च्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल…
टी-20 क्रिकेटमध्ये भारत व पाकिस्तान एकूण 12 वेळा आमने सामने आले असून त्यात भारताचेच वर्चस्व जास्त राहिले आहे. या 12 सामन्यांपैकी तब्बल 9 सामन्यांत भारतीय संघानेच विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत.