IND vs ENG – टी-२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ६ बाद १६८ धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आलेली नाही. विराट कोहलीने सावध खेळ करत यंदाच्या स्पर्धेतील चौथे अर्धशतक केले. तर हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची तुफानी खेळी खेळली आहे.
“भारत असो किंवा इंग्लंड आम्हाला काही फरक नाही पडत”,फायनलबाबत बाबर आझमचे वक्तव्य!
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कारण भारताचे सलामीवीर पुन्हा एकदा फ्लॉप राहिले. केएल राहुल ५ धावा तर कर्णधार रोहित शर्मा २८ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही १४ धावांवरच बाद झाला. त्यामुळे फलंदाजीची पूर्ण जबाबदारी विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी आपल्या खांद्यावर घेतली. विराटने सावध खेळी करत ४० चेंडूत ५० धावांची खेळी केली तर हार्दिकने तुफानी खेळी करत अर्धशतक ठोकले. इंग्लंडकडून गोलंदाजीत ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ तर आदिल रशीद आणि ख्रिस ओक्स यांनी १-१ गडी बाद केला.
इंग्लंडने फलंदाजीत डावाची सुरुवात अत्यंत चांगली केली. त्यांनी पॉवर-प्ले मध्ये एकही गडी न गमावता ६३ धावा ठोकल्या. त्यामुळे सध्या सामन्यात इंग्लंडचा संघ सुरक्षित स्थितीत आहे. त्यांनी ७ षटकांमध्ये गडी न गमावता ७५ धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजीत कोणतीही चमक पाहायला मिळाली नाही. कारण अलेक्स हेल्स आणि जोस बटलरला कोणताही गोलंदाज अडचणीत आणू शकला नाही. दोन्ही सलामीवीर बिनधास्त फलंदाजी करताना दिसत आहेत.