टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना ऍडिलेडच्या मैदानावर जात आहे. या सामन्यादरम्यान सर्वांनाच भारतीय संघाचा विजय हवा आहे. कारण जगभरातील क्रिकेट चाहत्यांना फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहायचा आहे. टी-२० विश्वचषकाचा फायनल सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.
सामना भारत-इंग्लंड यांच्यामध्ये होतोय, मात्र चर्चा अमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटाची
बुधवारी पहिला सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ४ गडी गमावून १५२ धावा केल्या होत्या. कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत ४६ धावा केल्या तर डॅरिल मिशेलने ३५ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली होती. पाकिस्तानकडून गोलंदाजत शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत तीन गडी गमावून विजय मिळवला. मोहम्मद रिझवानने ४३ चेंडूत ५७ तर कर्णधार बाबर आझमने ४२ चेंडूत ५३ धावा केल्या होत्या. मोहम्मद हरिसने ३० धावांचे योगदान दिले होते. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले होते.
पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचल्यानंतर आता भारतानेही इंग्लंडचा पराभव करावा आणि फायनल सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा खेळला जावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान फायनलमध्ये भारत-पाकिस्तान असा सामना होईल का? याबाबत बाबर आझमला विचारले आता तो म्हणाला की, “कोणता संघ फायनलमध्ये प्रतिस्पर्धी असेल हे आत्ताच सांगता येणार नाही.मात्र प्रतिस्पर्धी कोणीही असो, आम्ही आमचे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करू. आम्ही नेहमीच आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. अंतिम सामन्यात दडपण येणं स्वाभाविक आहे.”