Yashasvi Jaiswal Double Hundred : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आणखी एक उत्कृष्ट खेळी खेळली. राजकोट कसोटीतही त्याने द्विशतक झळकावले. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले होते.
सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. कांबळीने 1992-93 मध्ये हे केले होते, त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर कांबळीने दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध 227 धावांची इनिंग खेळली.
भारताकडून सलग दोन कसोटी सामन्यात द्विशतक
१९९२-०३ – विनोद कांबळी वि इंग्लंड आणि झिम्बाब्वे
२०१७-१८ – विराट कोहली वि. श्रीलंका
२०२३-२४ – यशस्वी जयस्वाल वि. इंग्लंड
विराट कोहलीने 2017-18 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात 213 आणि दिल्लीत 243 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता यशस्वीने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडविरुद्ध 209 धावा केल्या होत्या, आता राजकोटमध्ये नाबाद 214 धावा केल्या.