Rohit Sharma vs Mahendra Singh Dhoni : विशाखापटन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी (World Test Championship) चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. विशाखापट्टणम कसोटीपूर्वी टीम इंडिया WTC पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होती, मात्र आता विजयानंतर रोहित ब्रिगेड दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
यासह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीला मागे टाकले. रोहितने भारताचा 296 वा विजय साकार केला. यापूर्वी धोनीच्या नावावर 295 सामन्यांचा भाग होता. आता रोहित या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू ठरला आहे.
भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकलेले खेळाडू
– विराट कोहली – ३१३
– सचिन तेंडुलकर – ३०७
– रोहित शर्मा – २९६
– महेंद्रसिंह धोनी – २९५
– युवराज सिंग – २२७
– राहुल द्रविड – २१६
IND vs ENG 2nd Test : पराभवानंतरही इंग्लंडच्या नावे झाली एका ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद…
दरम्यान, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. आता पुढील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.