IND vs ENG 2nd Test , Amazing record in the name of Jasprit Bumrah : असे म्हटले जाते की जिथे सर्वजण अपयशी ठरतात तिथे जसप्रीत बुमराह दमदार कामगिरी करतो. हैदराबादनंतर विशाखापट्टणममध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने हैदराबादमध्ये बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करून इंग्लंडचा डाव संपवला होता आणि आता पुन्हा एकदा त्याने इंग्लंडच्या कर्णधाराला क्लीन बोल्ड केलं आहे. बुमराहचा चेंडू एखाद्या लेझर गाईडेड मिसाईलसारखा होता की बेन स्टोक्सचा ऑफ स्टम्प उडून गेला आणि तो आश्चर्याने बघतच राहिला.
दरम्यान या सामन्यात त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील 150 बळीही पूर्ण केले. तसेच टॉम हार्टलीला बाद करून सामन्यातील पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. जसप्रीतने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 15.5 षटकात 45 धावा देताना 6 बळी घेतले. यादरम्यान त्याने 5 षटके निर्धाव टाकले.
𝘚𝘵𝘰𝘬𝘦𝘴’ 𝘳𝘦𝘢𝘤𝘵𝘪𝘰𝘯 𝘴𝘢𝘺𝘴 𝘪𝘵 𝘢𝘭𝘭 😱
1⃣5⃣0⃣ Test wickets for the Wrecker-in-chief! 🤌#Bumrah #INDvENG #BazBowled #IDFCFirstBankTestsSeries #JioCinemaSports pic.twitter.com/cWG7HfKqir
— JioCinema (@JioCinema) February 3, 2024
सर्वात जलद 150 कसोटी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज…
यासह जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात वेगवान 150 कसोटी बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकत त्याने 64 व्या डावात ही कामगिरी केली. कपिलने 67 डावात ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर जवागल श्रीनाथ येतो. श्रीनाथने 72 डावात ही कामगिरी केली होती.
सर्वात जलद 150 कसोटी बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज…
इरापल्ली प्रसन्ना आणि अनिल कुंबळे या फिरकीपटूंसह सर्वात जलद 150 कसोटी बळी घेणारा बुमराह हा संयुक्त तिसरा भारतीय गोलंदाज आहे, ज्यांनी 34 सामन्यांमध्ये 150 कसोटी बळी पूर्ण केले आहेत. सर्वात जलद 150 कसोटी बळी घेण्याचा भारतीय विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे, ज्याने हा टप्पा गाठण्यासाठी 29 सामने खेळले, तर रवींद्र जडेजाने 32 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
Timber Striker Alert 🚨
A Jasprit Bumrah special 🎯 🔥
Drop an emoji in the comments below 🔽 to describe that dismissal
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U9mpYkYp6v
— BCCI (@BCCI) February 3, 2024
बुमराहने 10व्यांदा केली ‘ही’ कामगिरी…
यापूर्वी बेन स्टोक्स एकदिवसीय शैलीत खेळत होता, मात्र रोहित शर्माने स्टोक्सला बाद करण्यासाठी जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. यानंतर बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत कर्णधाराला निराश केले नाही आणि स्टोक्सला त्रिफळाचित करत माघारी धाडलं. याआधी बुमराहने पहिल्या सामन्यातील नायक ऑली पोपला आउट स्विगं करत पहिल्यादा तंबूचा रस्ता दाखवला होता. यानंतर बुमराहने टॉम हार्टलला बाद करून आपले पाच बळी पूर्ण केले. आणि जेम्स अँडरसनला बाद करत आणि सहा बळी पूर्ण करताना इंग्लंडचा डाव 55.5 षटकांत 253 धावांवर संपवला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी डावात 5 विकेट घेण्याची ही 10वी वेळ आहे.
Memorable Performance ✅
Special Celebration 🙌
Well bowled, Jasprit Bumrah! 🔥 🔥
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV #TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bRYTf68zMN
— BCCI (@BCCI) February 3, 2024
150 कसोटी बळी तेही सर्वात कमी चेंडूत (भारतीय गोलंदाज)
इतकेच नाही तर बुमराह सर्वात कमी चेंडूत 150 बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. त्याने विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मागे टाकले. या यादीत मोहम्मद शमी, कपिल देव आणि आर. अश्विनचा समावेश आहे.
1. जसप्रीत बुमराह : 6781 चेंडू
2. उमेश यादव : 7661 चेंडू
3. मोहम्मद शमी : 7755 चेंडू
4. कपिल देव : 8378 चेंडू
5. आर अश्विन : 8380 चेंडू
दरम्यान, पहिल्या डावात 396 धावा करून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी सर्वबाद झाला. यानंतर त्याने इंग्लंडचा डाव 253 धावांत गुंडाळला. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आज एकही विकेट पडू दिली नाही. टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत बिनबाद 28 धावा केल्या. यशस्वी 15 तर रोहित 13 धावांवर नाबाद आहे. भारताची एकूण आघाडी आता 171 धावांची आहे.
अश्विनसोबत पाचव्यांदा असे घडले….
रविचंद्रन अश्विनला पहिल्या डावात एकही यश मिळाले नाही. असं पाचव्यांदा घडलं आहे की, अश्विनचा संघात समावेश असताना भारताविरुद्ध कसोटी सामन्यात इतर संघ ऑलआऊट झालाआहे आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यापूर्वी 2016 मध्ये इंग्लंड, 2017 मध्ये श्रीलंका, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध असे घडले आहे.