\n

इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला…

\n

भारताचा डाव 396 धावांवर आटोपल्यानंतर  प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. बेन डकेटने 21 धावा केल्या. यानंतर 114 धावांच्या स्कोअरवर ब्रिटिशांना दुसरा धक्का बसला. जॅक क्रॉली 76 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. जॅक क्रॉलीनंतर इंग्लिश फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली.

\n

IND vs ENG 2nd Test Day 2 : बुमराहचा बळीचा षटकार! इंग्लंडचा पहिला डाव 253वर आटोपला, भारताला मिळाली मोठी आघाडी…

\n

\n

इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.

\n

भारताच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले.  त्याच्या गोलंदाजीला इंग्लिश फलंदाजांकडे उत्तर नव्हते. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. बुमराहशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवने 3 बळी घेतले तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. अनुभवी फिरकीपटू अश्विनला एकही गडी बाद करता आला.

\n

भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…

\n

याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला. भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी करत द्विशतक झळकावत 209 धावा केल्या. आपल्या 209 धावाच्या खेळीत यशस्वीने 290 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याच्या बॅटमधून 19 चौकार आणि 7 षटकार आले.

\n

IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…

\n

\n

भारतीय संघाच्या पहिल्या डावात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच भारताची एक बाजू संभाळून धरली. यशस्वी जैस्वालला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून फार काळ साथ मिळाली नाही, तरीही त्याने सर्व फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वाच्या भागीदारी केल्या. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. 34 धावा करणारा शुभमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

\n

#U19WorldCup2024 : द. आफ्रिकेच्या युवा वेगवान गोलंदाजाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू…

\n

\n

भारताचे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले आणि आता या दोघांनाही संघातून वगळले जाऊ शकते. तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड अजून व्हायची आहे. विराट कोहली संघात परतला तर श्रेयस अय्यर टीम इंडियातून वगळले जाऊ शकते . त्याचवेळी राहुलही फिट झाल्यास शुभमन गिललाही संघातून बाहेर केले जाऊ शकते.

\n

41 वर्षीय जेम्स अँडरसनची दमदार कामगिरी….

\n

इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात त्यांच्या बाजूने सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसन होता. त्याने आपला सर्व अनुभव भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजीत पणाला लावला. याचा पुरेपूर फायदा अँडरसनलाही झाला. या डावात त्याने 25 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 4 षटके निर्धाव टाकताना केवळ 47 धावा दिल्या. भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने शुभमन गिल, आर अश्विन आणि यशस्वी जैस्वाल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याव्यतिरिक्त शोएब बशीर आणि रेहान अहमदने प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs#webpage","name":"IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/ind.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-2nd-test-day-2-stumps-second-days-play-ends-team-india-has-a-lead-of-171-runs","name":"IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…"}}]}}}

IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…