Obc Elgar Sabha – गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. जरांगेच्या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ हे कडाडून विरोध करत आहेत. आज छगन भुजबळ यांची नगरमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली.मनोज जरांगे पाटील यांना बजेटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी बजेटमधून आरक्षण देता येत असेल तर पहा अशी मिश्किल टिपण्णी केली होती. जरांगेच्या या विधानाचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला.
मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची आणि विचारवंतांची हा कसला मराठा समाजाचा नेता जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येत का पहा असं जरांगे यांना उद्देशून भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, यावर कोण बोलायला तयार नाही.. कोणाच्या मागे चाललात तुम्ही ? गावागावामध्ये दरी पडतेय. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही म्हणतोय आमचं आरक्षण कमी करून नका त्यांना वेगळं द्या अशी परखड भूमिका देखील त्यांनी यावेळी जाहीर केली.
तुम्ही तर म्हणाले गुलाल उधळला.. अध्यादेश आला.. आरक्षण मिळालं मग परत उपोषण कशाला ? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी जरांगे यांना उद्देशून उपस्थित केला. मराठा समाजाला आमचा विरोध नाही.परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या. मुख्यमंत्री म्हणाले मी मराठा समाजाला दिलेली आरक्षणाची शपत पूर्ण केली मग हा ओबीसी आयोग कशासाठी ? असंही ते यावेळी म्हणाले.
भर सभेत छगन भुजबळ यांनी काही दाखले दाखवले यामध्ये खाडाखोड करून नोंद करण्यात आल्याचे दाखवले. मराठी कुणबी तसेच कुणबी मराठा अशा नोंदी हाताने लिहिलेल्या नोंदी यावेळी भुजबळांनी सर्वांसमोर मांडत ही दिशाभूल कशासाठी असा सवाल उपस्थित केला.
यावेळी कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न दिल्याबद्दल भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.या मेळाव्यासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते देखील उपस्थित होते.
Obc Elgar Sabha, chhagan bhujbal, manoj jarange, maratha reservation