मुंबई – रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
यापुढे रेल्वे परिसरातील हालचालींवर नजर ठेण्यासाठी आरपीएफ जवानांच्या खांद्यावर ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. अशी माहिती आरपीएफकडून देण्यात आली.
या कॅमेराच्या मदतीने घटनेची संपूर्ण माहिती रेकॉर्ड करता येणार आहे. तसेच परिसरातील प्रत्येक हालचालींवर नजर करडी ठेवली जाणार आहे
बॉडी वॉर्न कॅमेऱ्याची क्षमता १० मेगापिक्सल इतकी असून त्यात ३२ जीबीपर्यंत डाटा साठवता येईल. रात्रीच्या वेळी नाइट व्हिजन कॅमेरा सुरू करता येईल.