दिल्ली : केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर गृहमंत्री अमित शहा व अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सोमवारी सुरक्षेत वाढ करण्यात आली. शाह आणि इतर नेत्यांची घरे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणा करणाऱ्यांच्या निशाण्यावर असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
“सध्याची परिस्थिती लक्षात घेता आंदोलनकर्ते केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थान, कार्यालयालायावर आंदोलंन करू शकतात,” असे सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे. आंदोलनकर्ते विजय चौक आणि इंडिया गेटवर निषेध करू शकतात.“ते विजय चौक, संसद मार्ग, इंडिया गेट, पोलिस मुख्यालय आणि गृहमंत्री (अमित शहा) यांच्या निवासस्थानी धरणे देऊ शकतात,” असे या सूचनेत म्हटले आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्या पटनायक यांना माहिती देण्यात आदी असून, पोलिसांनी मंत्र्यांच्या निवासस्थानावर सुरक्षा अधिक कडक केली आहे. पोलिस आयुक्त म्हणाले, “नवी दिल्ली जिल्ह्यात त्वरित सुरक्षा दले आणि स्थानिक पोलिस तैनात करण्याची गरज आहे.”पीसीआर व्हॅन तसेच नवी दिल्ली जिल्हा क्विक रिस्पॉन्स टीम यांनी सतर्क राहावे असेही पटनायक म्हणाले.
सोशल मीडियावर सतत नजर ठेवली जात आहे. “स्थानिक पोलिस, महिला पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, सुरक्षा दले आणि पोलिस नियंत्रण कक्षासह प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा,” असे या सूचनेत म्हटले आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदवणा विद्यार्थ्यां सोबत पोलिसांची धुमश्चक्री उडाली होती. निदर्शनादरम्यान जामियाच्या परिसरात बसेस आणि वाहनांना आग लावण्यात आली होती . परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यात विद्यार्थ्यांसह पोलीस जखमी झाले होते.