नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 137 रुपयांनी वाढून 47,311 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 160 रुपयांनी कमी होऊ 63,482 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात महागाईच्या शक्यतेमुळे सोन्याचे दर आगामी काळात वाढण्याची शक्यता असल्याचे बऱ्याच विश्लेषकांना वाटते. त्यामुळे वायदे बाजारावर सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
भारतामध्ये दिवाळी आणि दसऱ्याच्या काळामध्ये सोन्याची बरीच खरेदी झाली आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.