नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया प्रकरणातील सीबीआयने जमा केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण करण्यास पी. चिदंबरम आणि अन्य आरोपींना ट्रायल कोर्टाने अनुमती दिली होती. पण सीबीआयने या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते पण हायकोर्टाने सीबीआयचा हा आव्हान अर्ज फेटाळला असून त्यांना ही कागदपत्रे तपासण्यास अनुमती दिली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणातील तपास अजून सुरू असून चिदंबरम हे या प्रकरणातील आरोपी आहेत, त्यांना ही कागदपत्रे तपासण्यास अनुमती दिली तर ते यातील पुराव्यात छेडछाड करू शकतील, असे कारण पुढे करीत सीबीआयने हा आव्हान अर्ज दाखल केला होता.
आरोपीला निष्पक्ष खटला चालवला जावा, अशी मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या विरोधातील कागदपत्रे तपासण्यासाठी मिळाली पाहिजेत अशी जर त्यांची भूमिका असेल तर ती मान्य करावी लागेल असे नमूद करीत कोर्टाने सीबीआयला चांगलाच झटका दिला.