नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर भारतातही सोन्याचे दर ऐतिहासिक उचांकी पातळीवर आहेत. भारतात सोन्याचे दर 66,400 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर स्थिर राहिले. मात्र चांदीचा दर शंभर रुपयांनी कमी होऊन 75,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
अमेरिका व्याजदरात कपात कधी करणार याचेे वेळापत्रक निश्चित होत नसल्यामुळे जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर जास्त पातळीवर आहेत. जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर 2,180 डॉलर व चांदीचा दर 24.29 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहेत. शेअरखान बाय बीएनपी परिबा या संस्थेचे विश्लेषक प्रवीण सिंह यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यानंतर सोने आणि चांदीच्या बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळ शकेल.