शिवसैनिकांनी बांधले हातात “घड्याळ’
अवसरी – आंबेगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष अरूण गिरे यांचे कट्टर समर्थकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला हदरा बसला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बेटवस्ती-निरगुडसर येथे मतदारांशी विवेक वळसे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी मेंगडेवाडी गावचे माजी सरपंच सोनभाऊ टाव्हरे, जिजाभाऊ गवारी, उत्तम गंगाराम टाव्हरे यांनी शिवसेनेला रामराम करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब मेंगडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक संजय गोरे, मेंगडेवाडी गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मेंगडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुभाष हांडे, पोपटराव मेंगडे, उदय हांडे, निलेश गवारी, डॉ. रवींद्रकुमार साकोरे, तुकाराम दांगट, शामराव टाव्हरे, जालिंदर टाव्हरे, हनुमंत टाव्हरे, राहुल हांडे, विशाल गवारी, सुरेश टाव्हरे, डॉ. शांताराम गावडे, वैभव मेंगडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अमोल गोरे यांच्यासह मेंगडेवाडी आणि निरगुडसर येथील पक्षाचे पदाधिकारी आणि मतदार उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील यांनी नेहमीच मेंगडेवाडी, निरगुडसर, जवळे, भराडी ही गावे आपली मानुन विकासकामे केली आहेत. विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट झाले आहे. वळसे पाटील यांना मत म्हणजे विकासाला मत हे समजूनही गावे वळसे पाटील यांना मताधिक्य देण्यात पुढे राहतील.
– बाळासाहेब मेंगडे, सदस्य, बाजार समिती, मंचर