मुंबई – महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली असून या परिषदेत वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या समावेशच्या विरोधात आता शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी करण अदानी यांच्या नियुक्तीला विरोध करणारा मेसेज ट्विटरवर टाकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आर्थिक परिषद सदस्यांच्या यादीत करण अदानी यांचे नाव पहायला मिळते हे नाव पाहिल्यानंतर हे सरकार नेमके कोणासाठी काम करते हे स्पष्ट होते आहे. अदानींसाठी हे सरकार चालवण्यापेक्षा हे राज्यच त्यांना देऊन टाका अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली असून महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.