फायबर हे शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. हे पचनाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबर समृद्ध असलेले कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकाल ते जाणून घ्या…
नट्स –
तुम्ही आहारात नट्सचा समावेश करू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये भरपूर फायबर असते. हे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात.
फ्लॅक्स सीड्स –
फ्लेक्स बिया किंवा जवसाच्या बिया भाज्या, कडधान्ये आणि ओट्समध्ये जोडून लोकप्रियपणे वापरल्या जातात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो.
मसूर –
मसूर ही केवळ प्रथिनांचा स्रोत नाही तर फायबरचाही मोठा स्रोत आहे. त्यात लोह, जीवनसत्त्वे आणि मॅंगनीजसारखे पोषक घटक देखील असतात. हे शरीरात फायबरची कमतरता होऊ देत नाही.
संपूर्ण धान्य –
संपूर्ण धान्यामध्ये बार्ली, कॉर्न, ब्राऊन राइस, बाजरी आणि क्विनोआ यांसारख्या धान्यांचा समावेश होतो. संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि झिंक सारखे पोषक घटक असतात. ते शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.