मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर (दि. 7 डिसेंबर) हे दोघे लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या जोडीने आपल्या कुटूंबीयांसमोर सात फेरे मारून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली आहे.
विकी-कतरीना यांच्या या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लग्नाच्या या धामधुमीत एक मराठी माणूस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सतीश चव्हाण असं त्यांचं नाव असून हे तासगावचे आहेत.
विकी कौशल-कतरिनाच्या लग्नातील सर्व दागिन्यांवर सतीश चव्हाण यांचं हॉलमार्किंग आहे. यामध्ये विकी कौशलच्या गळ्यातील हार, फेट्यावरील तुरा तसेच कॅटरीनाच्या दागिन्यांवर हे हॉलमार्किंग दिसून येत. सतीश चव्हाण हे सोने-चांदी गलाईचा व्यवसाय करतात. आणि ते मूळचे मराठी आहेत.