हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचे नाव डांबराने लिहले जाईल : अतुल भातखळकर

मुंबई – हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरे तुमचे नाव डांबराने लिहले जाईल अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व सण-समारंभांना बंदी घातली आहे. मात्र ईदच्या मिरवणूकीला परवानगी दिली आहे. असा आरोप करत भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, गणेश वित्सर्जनाला परवानगी नाकारली, सोसायटीमध्ये गर्बा खेळायला बंदी, दहीहंडीला बंदी. मात्र, ईदच्या मिरवणूकीला परवानगी दिली आहे. व्वा ठाकरे सरकार. हे यांचे हिंदूत्व असे म्हणत हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरे तुमचे नाव डांबराने लिहले जाईल. असी टीका त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.